एकदा राख झाल्यावर आपण कोण होतो, हा प्रश्न आपल्याला पडणार नाही. तोपर्यंत हिंदू म्हणून जगण्याची आणि ‘हिंदू’ कादंबरी वाचण्याची धडपड आपण करत रहायला हवी

कालांतराने पहिली कादंबरी गाजल्यावर मग दुसरी, मग चौथी असे उदाहरणार्थ लेखन चमत्कार दाखविण्यात बिझी झाल्याने, पांडुरंगाच्या हातून आर्तता निसटली ती निसटलीच. उरले ते कसब आणि प्रचंड कष्टाळुपणे तावांमागून तावांवर ताव मारत राहणे. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या ‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखकांविषयी तुच्छतादर्शक बोलून बोलून दमल्यावर शेवटी पांडुरंगाने स्वत:च २०१४ साली ज्ञानपीठाच्या पायरीवर आपलेही बूड टेकले.......